अथांग फाउंडेशन व NDA रोड परिसर सोसायटी महासंघाच्या वतीने राबविला E वेस्ट व प्लास्टिक संकलन अभियान


पुणे प्रतिनिधी: अथांग फाउंडेशन व व NDA रोड परिसर सोसायटी महासंघ – पुणे, यांनी संयुक्तिक स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून E-वेस्ट व टाकावू प्लास्टिक संकलन अभियान मोठ्या उत्साहात राबविले.यामध्ये परिसरातील जवळ जवळ 10 ते12 मोठ्या सोसायटींनी भाग घेतला .

अथांग फाउंडेशन चे अध्यक्ष श्री प्रकाश पवार यांनी या सर्व अभियानाची रूप रेखा आखली होती NDA रोड परिसर सोसायटी महासंघाच्या वतीने अध्यक्ष श्री नवनाथ नलावडे व खजिनदार श्री प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला त्यांना सहकार्य करण्यासाठी सल्लागार श्री सलीम भाई शेख,श्री गंधाधर कुऱ्हाडे,श्री धनंजय दंडवते व इतर सदस्य यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

या अभियानात अथांग फाउंडेशन तर्फे अथांग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश पवार, सचिव डॉ.दादा दडस संचालिका सौ.सुचेता यादव, सौ.अरुणा पवार, सौ.आश्विनी कदम व मित्र सदस्य श्री.अश्विन शर्मा,श्री.प्रल्हाद महाजन, कु.अरुष पवार यांनी आपले बहुमूल्य योगदाना दिले .यानिमित साधारण 200 ते 250 किलो ,E कचरा व प्लास्टिक संकलन झाल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले.प्लास्टिक मुक्ती साठी श्री प्रकाश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या अभियानाची सर्व परिसरात दिवसभर चर्चा होती व असे अभियान राबविण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांनी महासंघाकडे व्यक्त केली.


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!