चला उद्योजक घडवूया! स्टार्ट अप टॉक सिरीज चे आयोजन.


पुणे प्रतिनिधी

चला उद्योजक घडवूया!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेंटर फॉर इनोव्हाशन इनक्यूबेशन आणि लिंकेजस व कर्वे समाज सेवा संस्था,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्ट अप टॉक सिरीज चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रम मध्ये ख्यातनाम जलतज्ञ व पाणी पूर्णवापर विषयामध्ये काम करणारे डॉ. अभिजित साठे यांनी सांडपाणी पूर्णवापर यासंदर्भात सुरु केलेल्या त्यांच्या स्टार्ट अप बाबत उपस्तिथ विद्यार्थी यांना यामध्ये असणाऱ्या संधी व आव्हाने याचे मार्गदर्शन केले.याच स्टार्ट अप टॉक सिरीज च्या दुसऱ्या सत्रात यशस्वी स्टार्ट अपचे अनभुव नव्या पिढीची दशा व संधी आणि आव्हाने याविषयावर डॉ. अमोल चौधरी यांनी विविध विषयामध्ये स्टार्ट करता असलेल्या संधी प्रकल्प सुरु करण्यात येणाऱ्या अडचणी पैसा उभा कसा करायचा यापासून ते उत्पादन मार्केटिंग ते उपलब्ध मार्केट यावर बहुमोल मार्गदर्शन केले,

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी प्रा.डॉ. महेश ठाकूर,संचालक कर्वे समाज सेवा संस्था हे होते, डॉ.ठाकूर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले. सदर स्टार्ट अप टॉक सिरीज चे आयोजन व प्रास्ताविक श्री.प्रकाश पवार यांनी केले, सूत्रसंचलन व वक्त्यांचे परिचय कु.प्रियांका, कु.प्राची, कु.सुमेधा यांनी केले, प्रा.डॉ. चित्रलेखा राजूस्कर यांनी आभार मानले.


3
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!