रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे तर्फे सूरमयी संध्या , गाण्याचा कार्यक्रम


पुणे प्रतिनिधी

पुणे:दिनांक २४ मार्च, मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे तर्फे सूरमयी संध्या हा हिंदी व मराठी गाण्याचा कार्यक्रम रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी फंड जमा करण्यासाठी केला. रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील गरजवंत लोकांसाठी सामाजिक कार्य करते.
सर्व कलाकार क्लब मधलेच होते.रो. विनायक पाटील, रो. अभिजीत कुलकर्णी, सौ पूर्वा रविकांत जोशी,सौ पूर्वा प्रसाद जोशी, सौ सारंधा पदवाड, सौरभ जोशी,सौ नूपुर शिपूरकर जोशी या कलाकारांनी भाग घेतला. कार्यक्रमाची संकल्पना रो. गजेंद्र सुतार यांची होती, याप्रसंगी क्लब प्रेसिडेंट रो. संजय पदवाड, सेक्रेटरी रो. योगेश तामखेडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.निवेदन सौ केतकी बुरांडे माजगावकर यांनी केले 250
वर रसिक प्रेक्षकांनी उत्साहाने यात सहभाग घेतला.क्लबतर्फे सर्वांना अल्पोपहार ठेवलं होते.


2
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!