वारजे – शिवणे – उत्तमनगर – कोंढवे धावडे परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी सोसायटी महासंघाचे प्रशासनाला पत्र.


शिवणे प्रतिनिधी : वारजे ,शिवणे , उत्तमनगर, कोंढवें धावडे या उपनगरात नागरिकांची वस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, गाड्यांची संख्या विविध भागात कामाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या ही वाढत आहे.पर्यायी रस्ते छोटे पडत आहेत, व वाहतूक कोंडी नेहमीचीच होत आहे.यासाठी NDA रोड परिसर सोसायटी महासंघाने पुढाकार घेऊन परिसरातील जवळ जवळ 150 पेक्षा जास्त सोसायटीच्या वतीने पत्र प्रशासनाच्या सर्वच स्तरातील कार्यालयाला देण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी वरती सोसायटी महासंघ यांनी पुढाकार घेऊन सर्व सबंधित पोलिस ठाणे,जिल्हा पोलिस प्रमुख, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार,खासदार सौ सुप्रियाताई सुळे,आमदार श्री भीमरावअण्णा तापकीर,खासदार श्री मुरलीधर मोहळ,वाहतूक नियंत्रकक्ष,तसेच इतर सबंधित कार्यालयात पत्र देण्याचे काम केले आहे.या कामी महासंघाचे अध्यक्ष श्री नवनाथ नलावडे, कार्याध्यक्ष श्री सुनील वरघुडे,सचिव श्री प्रवीण लांडगे,खजिनदार श्री. प्रशांत देशमुख,सल्लागार श्री सलीम भाई शेख, सदस्य श्री श्याम लोले, श्री संग्राम भोसले, श्री गंगाधर कुऱ्हाडे, व इतर सदस्य व सभासद यांनी हातभर लावला.

सोसायटी महासंघाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की शिदेपूल व नवभारत हायस्कुल या परिसरात सिग्नल बसवून लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा,शिंदे पूल ते कोंढवे धावडे रस्त्याला डिव्हायडर बसविण्यात यावे, पुथपाथ वरील अतिक्रमणे काढण्यात यावीत,अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहे.येणाऱ्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल अशी आशा नागरिकांना आहे .या कार्याची चर्चा संपूर्ण परिसरात चालली आहे व सोसायटी महासंघाचे कौतुक सर्व थरातून होत आहे.


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!