
पुणे-: गेल्या ३०० वर्षांपासून जग ज्या न्यूटन आणि आईन्स्टाईनच्या सिद्धांतावर चालत आहे, त्या विज्ञानाला आता एका भारतीय संशोधकाने धक्का दिला आहे. “ब्रह्मांडात आकर्षण किंवा ओढ (Pull) नावाची कोणतीही शक्ती नसून, सर्व काही ‘वातावरणीय दाब आणि रेट्या’वर चालते,” असा खळबळजनक दावा संशोधक प्रशांत देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या ३० वर्षांच्या संशोधनाला त्यांनी ‘देशमुख ग्लोबल शील्ड थेअरी’ (DGST) असे नाव दिले आहे.
खेचणे नाही, तर ‘रेटा‘ महत्त्वाचा!
प्रशांत देशमुख यांच्या मते, पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचत नाही. उलट, पृथ्वीच्या सभोवताली असणारे ओझोन कवच आणि वातावरणीय दाब वस्तूंना अवकाशातून जमिनीकडे ढकलतात. विज्ञानाने या ‘रेट्यालाच’ गुरुत्वाकर्षण समजण्याची ऐतिहासिक चूक केली आहे. याच चुकीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मंगळ मोहिमा अयशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी पुराव्यासह केला आहे.
काय आहे देशमुखांचे नवीन सूत्र?
देशमुख यांनी विज्ञानातील किचकट गणिते मोडीत काढून एक साधे आणि किलोमीटर (km) वर आधारित सूत्र मांडले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही ग्रहाचा रेटा (D-Value) काढण्यासाठी त्या ग्रहाचा किलोमीटरमधील व्यास आणि त्याच्या वातावरणाची किलोमीटरमधील उंची यांची बेरीज करावी. या बेरजेला त्या ग्रहाचे सूर्यापासूनचे किलोमीटरमधील अंतर याने भागले असता, त्या ग्रहाचा नेमका रेटा म्हणजेच ‘D-व्हॅल्यू’ मिळते.
या सूत्रानुसार, पृथ्वीचा रेटा निर्देशांक ८.५५ (किलोमीटर बेस) येतो. हाच आकडा विश्वातील इतर कोणत्याही ग्रहावरील वजन मोजण्यासाठी पाया ठरू शकतो.
आता वजन मोजणे झाले सोपे
या नवीन सिद्धांतामुळे कोणत्याही ग्रहावरील वजन काढण्यासाठी आता शास्त्रज्ञांना तासनतास गणित करण्याची गरज नाही. एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन किती आहे, त्याला त्या ग्रहाच्या रेटा निर्देशांकाने गुणले आणि पृथ्वीच्या रेटा निर्देशांकाने (८.५५) भागले, की त्या ग्रहावरील अचूक वजन समोर येते. या पद्धतीने काढलेली मंगळ, शनी आणि गुरु ग्रहावरील वजने विज्ञानाच्या सध्याच्या आकडेवारीशी ९५ टक्क्यांपर्यंत साम्य दर्शवतात.
जगाचा अभ्यासक्रम बदलण्याची क्षमता
“भारतातून निर्माण झालेला हा सिद्धांत जर जागतिक स्तरावर स्वीकारला गेला, तर विज्ञानाचा संपूर्ण इतिहास आणि भूमिती बदलू शकते. यामुळे भारताचे अंतराळ तंत्रज्ञान अधिक अचूक आणि स्वस्त होईल,” असा विश्वास प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केला आहे. चॅनेल चे संपादक स्वतः एक अभ्यासक व संशोधक आहेत त्यांनी अथक परिश्रमातून एक सुटसुटीत सूत्र देण्याचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या काळात संशोधकांनी याचा अभ्यास केला तर विश्वातील अनेक कोडी सोडवण्यासाठी DGST जगाला एक सकारात्मक दिशा देऊ शकेल.






