पुणे: पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३३ मधील कार्यसम्राट म्हणून ख्याती असलेले नगरसेवक माननीय सुभाषभाऊ नाणेकर यांनी आपल्या कामाला धडाकेबाज सुरुवात केली. प्रभाग क्रमांक 33 मधील शिवणे उत्तमनगर, कोपरे ,कोंडवे – धावडे या गावातील बहुचर्चित पाणी प्रश्न यासंदर्भात नगरसेवक श्री सुभाषभाऊ नाणेकर यांनी मनपा मुख्य अभियंता यांची भेट घेऊन या संदर्भात दीर्घ चर्चा केली.
या भागात लोकसंख्या वाढ झपाट्याने होत असल्यामुळे सद्यस्थितीत असलेली पाणी व्यवस्था खूपच तोकडी व कमी पडत आहे, त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासंदर्भात टंचाई भासत आहे या सदर्भात नगरसेवक नसतानाही सुभाष भाऊ यांनी नेहमीच लक्ष घातले होते परंतु जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून नियुक्त केल्यानंतर जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी पाणी प्रश्न लवकरात लवकर कसा सोडवता येईल यासंदर्भात पुणे मनपाचे मुख्य अभियंता श्री नंदकिशोर जगताप व कनिष्ठ अभियंता श्री रोहन कापसे यांच्याबरोबर दीर्घ चर्चा केली व या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निवेदन केले.


त्यावेळी श्री जगताप साहेब यांनी आश्वासन दिले की लवकरच टेक्निकल टीम घेऊन या संबंधित गोष्टीची पाहणी केली जाईल व काम मार्गी लावून देण्यात येईल. माननीय श्री सुभाष भाऊ नाणेकर यांनी नगरसेवक म्हणून पदभार स्वीकारताना आपल्या कामाचा धडाकेबाज प्रारंभ केला असे जनतेतून सूर उमटू लागले आहेत.याची चर्चा दिवसभर परिसरात चालली होती व जनतेतून कौतुक होत आहे
.








