शिवसेना(शिंदे गट)राष्ट्रवादी(स्वर्गीय अजित पवार)यांचे निवडणुकीतील यश….!


नगरपालिका,महानगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समित्या मधील निवडणुका पार पडल्या.सत्ताधारी महायुतीतील पक्षच यश मिळवून गेले.राष्ट्रीयपक्ष भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला. सत्ता पैसा व विस्तृत कार्यकर्त्यांचे जाळे ही प्रमुख कारणे आहेत नंबर एकचा पक्ष ठरण्यास.दुसरा प्रमुख राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची परस्थिती व कामगिरी खूपच सुमार व खराब होती.त्यांच्या बद्दल न बोललेले बरे.

या सर्व निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व राष्ट्रवादी (स्वर्गीय अजित पवार) या दोन पक्षाला.ठाकरेंची जादू व शरद पवारांचे डावपेच या निवडणुकीत कुठे ही चालली नाही किंवा ती क्षीण झाली अस म्हणावं लागेल. पण हे वरवर होणारे विश्लेषण आहे.मोठे पवार यांचा राजकीय आवाका संपला का?ठाकरे बाणा ठाकरे शैली चालली नाही का ?

एकनाथ शिंदे सेना यांना निवडणुकीत यश का मिळाले? याचा अभ्यास केला तर काही प्रमुख कारणे दिसतील.ठाकरे सारखं प्रभावी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं नक्कीच नाहीत.त्यांचा दिसतो तसा संपर्क ही कार्यकर्त्यांशी नाही.पक्ष चालविण्याचा कोणताच अनुभव पाठीशी नाही.मतदार संघ व मंत्री पद यापेक्षा जास्त न पाहणारे शिंदे यांना एवढे यश मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष व दिल्ली दरबाराचा असणारा आशीर्वाद, ज्यामुळे त्यांना शिवसेनेचे मूळ चिन्ह मिळाले ते म्हणजे “धनुष्यबाण”.महाराष्ट्रात किंवा देशात जिथे जिथे शिवसेना पोहचली आहे त्यांना धनुष्यबाण म्हणजेच शिवसेना माहित आहे.त्याच बरोबर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर.ग्रामीण भागात शिवसेना म्हणजे “धनुष्यबाण” व “धनुष्यबाण” म्हणजे शिवसेना एवढंच माहीत आहे त्यामुळे कार्यकर्ते किंवा मतदार यांनी शिवसेना मत दिले आहे एकनाथ शिंदेंना नाही हे नमूद करावेच लागेल.दुसरे कोणतेही चिन्ह घेऊन स्वतः एकनाथ शिंदे सुधा त्यांच्या मतदार संघात निवडून येतील का ही शंका आहे.हे वास्तव आहे.जर “धनुष्यबाण”. हे चिन्ह नसते तर एकनाथ शिंदे यांना एक सीट निवडून आणणे सुधा अवघड झाले असते. चिन्ह व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या दोनच गोष्टीमुळे शिवसेनेला यश मिळाले हे अधोरेखित करावेच लागेल.

उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश का मिळाले नाही याचा ही विचार करावा लागेल.ठाकरे बाणा त्यांची जादू, ठाकरेंचे वलय कमी झाले आहे का?तर या निवडणुकीवरून एकच गोष्ट समोर आली आहे की नवीन चिन्ह घेऊन पुरेसा वेळ नसताना ही मिळवलेले यश हे खूप मोठे आहे.ठाकरे या नावावरती त्यांनी अनेक ठिकाणी यश प्राप्त केले आहे.नवीन चिन्ह घेऊन जनतेत जाणे व यश मिळविणे खूप कठीण असते. परंपरागत काँग्रेस कडे चिन्ह असून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या एवढे यश काँग्रेसला मिळविता आले नाही.त्यामानाने उद्धव ठाकरे यांची निवडणुकीतील कामगिरी विशेष महत्त्वाची आहे.याचा विचार येथील निवडणूक विश्लेषक यांनी करणे गरजेचे होते,पण तसे होताना दिसत नाही.

राष्ट्रवादीने (स्वर्गीय अजितदादा) नगरपालिकेत मर्यादित यश मिळविले.महानगरपालिकेत पिछेहाट झाली पण जिल्हापरिषेद अभूतपूर्व यश मिळविले.याचा विचार होणे ही गरजेचा आहे.एकनाथ शिंदे यांच्या सारखेच स्वर्गीय अजितदादा यांच्या पक्षाकडे मूळ चिन्ह “घड्याळ”आहे जे जनमानसात व समाजात रुजले आहे.दादांच्या पक्षावर ही भाजपाचा आशीर्वाद आहे.”घड्याळ”चिन्ह आहे मोठ्या पवारानी तयार केलेली राजकीय फळी आहे त्यामुळे दादांच्या पक्षाला यश मिळाले.नवीन चिन्ह घेऊन जर दादांच्या पक्षांनी लढायचे ठरविले असते तर हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच नेते निवडून आले असते.बाकी मोठे यश मिळालेच नसते.हे वास्तव स्वीकारले पाहिजे.फक्त नवीन चिन्हावरती एकनाथ शिंदे पेक्षा दादा सरस ठरले असते.कारण ते तळागाळात रुजलेले नेते होते.नवीन चिन्ह असते तर दादांच्या पक्षाला ही यश मिळाले नसते हे मुद्दाम नमूद करावेच लागेल.राजकीय विश्लेषक यांनी याचा विचार करायला हवा.

मोठ्या पवारांची राजकीय ताकत संपली आहे का?राजकीय डावपेच कुठे कमी पडले की एवढा प्रदीर्घ अनुभव असताना मोठ्या पवाराना यश मिळविता आले नाही?याचे प्रमुख कारण आहे नवीन चिन्ह.नवीन चिन्ह घेऊन जनतेत उतरणे व तेही वय साथ देत नसताना हे खूपच कठीण काम होते.प्रदीर्घ राजकीय अनुभव एकनिष्ठ नेते यांच्या जीवावरती त्यांनी जे यश मिळविले ते नक्कीच एकनाथ शिंदे व दादांच्या राष्ट्रवादीला विचार करायला लावणारे आहे. मोठे पवार जर शारीरिक दृष्टीने फिट असते तर नवीन चिन्ह घेऊन सुधा त्यांनी मैदान मारले असते.सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एकनाथ शिंदे व दादांच्या राष्ट्रवादीला मिळालेले यश हे फक्त मूळचिन्ह मिळाले म्हणून आहे.नवीन चिन्ह असते तर दोन्ही पक्षाचे “पानिपत”झाले असते.


3
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!