*एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघाचा* प्रथम *वर्धापन दिन* व *शिवजयंती उत्सव* अत्यंत उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.


पुणे प्रतिनिधी

शिवणे उत्तमनगर – *एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघाचा* प्रथम *वर्धापन दिन* व *शिवजयंती उत्सव* अत्यंत उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.  बालगोपाल *मावळ्यांनी* सादर केलेल्या विविध कलागुणांच्या मनोहारी सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. त्यांच्या देशभक्तीपूर्ण आणि संस्कारमय प्रस्तुतीने उपस्थित सर्वांची मने जिंकली.

अनेक सोसायट्यांतील चेअरमन, सेक्रेटरी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमासाठी प्रेरणादायी ठरली. *नवनिर्वाचित नगरसेवकांनी* व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ *पोलिस निरीक्षक श्री. राघवेंद्र सिग क्षिरसागर साहेब* यांनी “ *माणुसकी, संस्कार आणि संस्कृती”* या विषयावर दिलेले *मोलाचे मार्गदर्शन* अत्यंत प्रेरणादायी व *विचारप्रवर्तक* होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली.

*युनिव्हर्सल अकॅडमीच्या टीमने* सादर केलेले थरारक प्रात्यक्षिक सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला शोभा आली.*लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीतील सर्व चेअरमन, सेक्रेटरी, सदस्य, माता-भगिनी* व बालकलाकार यांनी महाराजांच्या वरील पाळणा व गीते ,पोवाडे सादर केली. त्यांच्यामुळे कार्यक्रम अधिक सुंदर आणि यशस्वी झाला.

श्री.महेश भादेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलेले विशेष सहकार्य अत्यंत मोलाचे होते. तसेच कार्यक्रम सुरळीत आणि व्यवस्थित पार पडावा यासाठी संचालक मंडळ – प्रवीण लांडगे-सचिव, प्रशांत देशमुख,- खजिनदार,सुनील वरघुडे, राकेश सर्जेराव, संतोष घारे,गंगाधर कुऱ्हाडे, धनंजय दंडवते, सलीम शेख , तुळशीदार नांदगावकर, श्याम लोले सर, देशपांडे सर (DL.अकॅडमी), यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन निश्चितच कौतुकास्पद होते.

या निम्मित महासंघातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून संग्राम भोसले, श्याम लोले, नागनाथ येडके, राजेश घावरे, संदेश गोपाळ आणि महेश भादेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


3
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!