शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल,पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचे दुःखद निधन.


कोल्हापूर प्रतिनिधी: -कोल्हापूरचे सुपुत्र शिक्षण महर्षी,माजी राज्यपाल,पद्मश्री डॉक्टर डी. वाय.पाटील यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.ते 90 वर्षाचे होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विभागात प्रचंड सक्रीय व प्रभाव असणारी व्यक्ती अशी ओळख संपूर्ण देशाला होती,महाराष्ट्राचा शैक्षणिक पाया सुधारण्यात महत्त्वाचं योगदान.डी. वाय.पाटील युनिव्हर्सिटी,डी. वाय.पाटील हॉस्पिटल, अशा अनेक संस्थेचे संस्थापक होते.त्यांची त्रिपुराचे ,बिहार व पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल म्हणून ही नेमणूक झाली होती.विधानसभेचे अनेक वर्ष ते आमदार ही होते.असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले.कोल्हापूर व राज्यावर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पतंगराव कदम व डॉ.डी. वाय.पाटील याच्या नावाशिवाय राज्याचा शैक्षणिक इतिहास लिहिला जाणार नाही.त्यांच्या जाण्याने शैक्षणिक विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांना महाराष्ट्र माझा 24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!