मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – उमेदवार सौ.पूजा जागडे.


शिवाजीनगर:”महाराष्ट्र माझा 24″च्या “निवडणूक विशेष 2026″च्या कार्यक्रमात आज प्रभाग क्रमांक 12 मधील तरुण फ्रेश चेहरा सौ.पूजा प्रतूल जागडे यांची मुलाखत घेण्यात आली.माझा चे संपादक श्री प्रशांत देशमुख यांच्या प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरे देण्यात आली.

मतदार संघातील ट्रॅफिक समस्या,रस्ते समस्या व घनकचरा समस्या या कामाला निवडून आले तर प्रथम प्राधान्य असेल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना प्रत्येक गरजू व पात्र स्त्रियांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या म्हणून करीत आले आहे व निवडून आल्या नंतर त्याला अजून बळ मिळाले व स्त्रियांना याचा अजून लाभ मिळवून देता येईल असे ही प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

सौ.पूजा जागडे या स्वतः सुशिक्षित व ग्रॅज्युएशन केलेल्या तरुण तडफदार उमेदवार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून त्या भाजपच्या शिवाजीनगर शाखेच्या सरचिटणीस म्हणून काम पाहत होत्या त्यांच्या केलेल्या कामाची पोहच पावती म्हणूनच प्रभाग क्रमांक 12 ची उमेदवारी मिळाली आहे असे ही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शन खाली अनेक कामे त्यांनी या प्रभागात केली आहे त्यामुळे येतील जनतेशी मी खूप जवळून जोडली गेलेली आहे त्यामुळे माझा विजय हा नक्की निश्चित आहे व जनता केलेल्या कामाची दखल घेऊन भरघोस मतांनी मला निवडून देतील अशी आशा ही त्यावेळी बोलून दाखविली.


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!