“महाराष्ट्र माझा 24″च्या बातमीचा इम्पॅक्ट ट्रॅफिक पोलिसांची कारवाई.


कोथरूड:- “महाराष्ट्र माझा 24″बातमीची दखल घेऊन मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बेकायदेशीर पार्किंग बाबत कोथरूड वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक श्री शेडगे साहेब यांनी आपल्या विभागाला सूचना देत अशा बेकायदेशीर पार्किंग वरती दंड लावण्याचे आदेश दिले.या सदर्भात गुरुवार दिनांक 8.जानेवारी ला सायंकाळी ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

पोलिस निरीक्षक श्री शेडगे साहेबांनी याबाबत महाराष्ट्र माझा 24 चे संपादक यांच्याशी बोलताना पोलिस प्रशासन,महापालिका प्रशासन व मेट्रो प्रशासन यांबाबत लवकरच एक sop तयार करून अशा पार्किंग संदर्भात निर्णय घेतला जाईल असे सूचक वक्तव्य केले.पालिका निवडणुका पार पडल्यानंतर या सबंधी लवकरच ठोस पाऊले उचलली जातील अशी आशा नागरिकांना वाटते.


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!