पुणे : शिवणे येथील कामठे वस्ती, एन.डी.ए. रोडवरील मे. कन्हैया स्वीट्स या मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान दुकानात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. कारवाईदरम्यान सुमारे २७ हजार २४० रुपयांची मिठाई व मोतीचूर बुंदी जप्त करून नष्ट करण्यात आली. तपासणीत मिठाई तयार करण्यासाठी विनाप्रमाणित रंगाचा वापर, अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती, झुरळांचा प्रादुर्भाव तसेच अन्न सुरक्षा व मानके नियमांतील शेड्युल ०४ नुसार आवश्यक स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईमुळे शिवणे परिसरातील मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानांची नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Views: 1





