एरंडवण – तथा कथित जागेची कामे करून देणारा एजंट श्री राजेंद्र झाडं यांनी जागेची कामे करून देतो म्हणून दोन लाख पंचाहत्तर हजार रुपयाची फसवणूक केली आहे अशी तक्रार श्री मनोज भालवणकर यांनी सौ रूपनंदा पवार यांच्या वतीने अलंकार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.एरंडवण येथील सौ रूपनंदा पवार यांची जागा आहे आणि या सदर्भातील काही कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी एजंट राजेंद्र झाडं यांनी 5 लाख रुपये खर्च येतो म्हणून सांगितला. त्याच्या अँडव्हान्स पोटी एजंट राजेंद्र झाडं यांनी दिनांक 3.1.2024 रोजी गुरुकृपा बंगल्यात येऊन दुपारी 3.18मी. रोख रक्कम 100000(एक लाख रुपये) घेतली.पुढे परत अँडव्हान्स पोटी रकमेची मागणी केली ती पुढील प्रमाणे घेतली आहे ,5.1.2024 रोजी रात्री 10.20मी.गुगल पे द्वारे रुपये 50000 दिले.त्याच दिवशी रात्री 10.32मी.गुगल पे द्वारे रुपये 50000 दिले.त्यानंतर त्यांच्या मागणी वरून 7.1.2024 रोजी रात्री 9.21 वाजता परत गुगल पे द्वारे रुपये 50000 हजार पाठविले त्यानंतर 25.3.2024 रात्री 11.05 वाजता रुपये 25000 दिले असे तक्रारदार श्री मनोज भालवणकर यांनी तक्रारात सांगितले आहे.या तक्रारीनुसार पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे.सदर एजंटने आणि कोणाची फसवणूक केली आहे का हे ही पोलिस तपासात उघड होईल अशी शंका तक्रारदार यांना आहे.या आशयाचे पत्र महाराष्ट्र माझा 24 च्याला इमेल द्वारे ही प्राप्त झाले आहे.पोलिस याबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.








