*तळसंदे येथील चावरे फाटा परिसरात वीज समस्येचा विळखा; संतप्त व्यावसायिकांचा आंदोलनाचा इशारा*


कोल्हापूर प्रतिनिधी – महेश मोहिते

तळसंदे- येथील चावरे फाटा ते हॉटेल जोतिबा या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि लो-व्होल्टेजच्या समस्येने व्यावसायिक व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘हॉटेल अभिरुची’चे मालक संतोष संकपाळ व स्थानिक संघटनांनी दिला आहे.

याबाबत महावितरणच्या नवे पारगाव येथील कोमल पाटील कनिष्ठ अभियंता पारगाव, तारिका शेळके उप अभियंता कोडोली यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गट नं. ४७४ परिसरात दिवसातून किमान ३ ते ४ वेळा वीज खंडित होते. सततच्या लो-व्होल्टेजमुळे फ्रिज, ओव्हन यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.स्थानिक वायरमनला वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून महावितरणने तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल व महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी संतोष संकपाळ, अण्णा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहित सुवासे, शिवसेना शहरप्रमुख भानुदास पाटील, जय शिवराय किसान संघटनेचे युवा-आघाडी अध्यक्ष महेश मोहिते,काँग्रेस मागासवर्गीय सेल शाखाअध्यक्ष राहुल यादव आणि राहुल संकपाळ ,शुभम संकपाळ,पंकज मगदूम आदी उपस्थित होते.


3
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!