प्रभाग क्रमांक ३३ मध्ये तिरंगी लढत…!


प्रतिनिधी – उत्तमनगर – शिवणे.

उत्तमनगर – शिवणे:अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आणि निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात राहणार हे चित्र स्पष्ट झाले.महानगर पालिकेत गावे समाविष्ट झाल्यानंतर प्रभागातून ही पहिलीच अधिकृत निवडणूक आहे.अनेक इच्छुक उमेदवार असून सुद्धा अर्ज माघारी नंतर प्रभाग ३३ मधून एकूण २३ उमेदवार रिंगणात राहिले.यात प्रत्येक गटात भाजपने उमेदवार दिला .या प्रभागातून प्रमुख लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)अशीच आहे परंतु शिवसेना (उद्धव ठाकरे गट)यांनी ही तुल्यबळ उमेदवार देऊन लढत तिरंगी केली.या प्रभागातून भाजपचे पारडे जरी जड वाटत असले तरी खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याने ही मोठी अहवान उभे केले आहे .शिवसेना (उद्धव ठाकरे)यांनी ही तोडीस तोड उमेदवार दिल्यामुळे सामना तिरंगी झाला आहे.सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदार राजाच्या हातात आहे एवढंच म्हणावे लागेल.


2
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!