इंदापूर:इंदापूर येथील बांधकाम व्यावसायिक श्री विजय नलावडे यांची शशिकुमार भुजबळ यांनी महालक्ष्मी इंटरप्राजेस व इन्फोटेक(मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे)या कंपनीच्या मार्फत सोनई दूध या डेअरीची सातारा जिल्हा वितरक व लेबर क्रॉन्ट्रक्ट देतो म्हणून तब्बल 19 लाख 99 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे अशी तक्रार विजय नलावडे व पत्नी प्रियांका नलावडे यांनी इंदापूर पोलिस स्टेशनला 25.9.2025 रोजी दाखल केली.
सविस्तर विजय नलावडे हे D.S. construction नावाच्या कंपनी चे मालक आहेत 2020 मध्ये त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता त्यातून त्यांनी काही धनराशी साठविली होती.कोरोनाच्या काळात लॉक डाऊन पडला व व्यवसायाला मंदी आली.त्यांनी नवीन कोणतातरी व्यवसाय चालू करावा असे वाटले.बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे जनसंपर्क ही वाढला होत त्यातूनच त्यांची ओळख महालक्ष्मी इंटरप्राजेस मध्ये मार्केटिंग मॅनेजर महेश जगदाळे या व्यक्तीशी झाली व त्यांनी विजय नलावडे यांना महालक्ष्मी इंटरप्राजेस या कंपनीच्या माध्यमातून “सोनई दूध”या डेअरीची सातारा जिल्हा डिस्ट्रबेशनशिप व डेअरी मधील लेबर कॉन्ट्रॅक्ट देतो असे सांगितले.नलावडे नवीन व्यवसायाच्या शोधात असल्याने त्यांनी या गोष्टीची माहिती घेतली. महालक्ष्मी इंटरप्राजेस या कंपनीचे मालक श्री शशिकुमार भुजबळ यांच्याशी महेश जगदाळे यांनी नलावडे बोलणे करून दिले.काही दिवस दोघांच्या मध्ये घरी येणे जाणे झाले नलावडे यांनी या सगळ्या गोष्टीवरून भुजबळ यांच्यावर विश्वास ठेवला व महालक्ष्मी इंटरप्राजेस यांच्या कडून “सोनई दूध”साठी काम करण्यामार्फत तयार झाले .हे कॉन्ट्रॅक्ट व वितरक म्हणून त्यांच्या कडे लेबर कॉन्ट्रॅक्ट साठी साडे बारा लाख डिपॉसिट व वितरक म्हणून साडेसात लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागेल म्हणून सांगितले.बांधकामातील पैसे यात लावायचा त्यांनी निर्णय घेतला काही कमी पडले तर हात उसने किंवा पाहुण्यांच्या कडून पैसे घेऊन हा व्यवसाय चालू करायचा ठरविला.नलावडे यांना विश्वास वाटावा म्हणून मॅनेजर महेश जगदाळे यांनी 9.एप्रिल 2021 ला “दैनिक पुढारी”या पेपरला सातारा आवृत्तीत लेबर पाहिजे म्हणून जगदाळे यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर व नलावडे यांचा नंबर टाकून जाहिरात दिली.यामुळे नलावडे यांचा विश्वास अजून वाढला व त्यांनी सुरवातीला 26.4.2021 ला 4 लाख रुपये दिले.त्यानंतर 29.4.2021 रोजी 12.5लाख रुपये दिले.अजून व्यवसाय का चालू होत नाही या संबंधी भुजबळ व जगदाळे यांना विचारणा केली असता.त्यांनी सर्व पैसे दिल्याशिवाय व्यवसाय चालू होणार नाही असे सांगितले.नलावडे यांनी हात उसने घेऊन ऑनलाईन 2 लाख दिनांक 4.6.2021रोजी पाठविले व 1 लाख रुपये दिनांक 5.6.2021 रोजी पाठविले. त्यानंतर 11.6.2021 रोजी 24500रुपये 7.5.2021 रोजी रुपये 24500 पाठविले असे 19लाख 99 हजार रुपये महालक्ष्मी इंटरप्राजेस व शशिकुमार भुजबळ यांना दिले.
एक दोन महिने विचारणा केली कॉन्ट्रॅक व वितरक म्हणून कधी पासून काम चालू होईल तर भुजबळ यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी विजय नलावडे यांना वाटले की आपली फसवणूक झाली आहे.हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी नलावडे कुटुंबियांनी भुजबळ यांची घरी जाऊन भेट घेतली व दिलेल्या रकमेची परत देण्याची मागणी केली .त्यावेळी नलावडे कुटुंबियांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.अंगावर कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला .त्यावेळी त्यांनी 112 ला फोन करून पोलिस बोलण्याचा प्रयत्न केला.काही महिने गेल्यानंतर त्यांनी इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये सप्टेबर 2025 ला रीतसर तक्रार दाखल केली.पण पोलिस प्रशासन यांनी FIR दाखल करण्यास टाळाटाळ केली.तक्रारीत त्यांनी महेश जगदाळे हा व्यक्ती बनावट कृषी अधिकारी आहे या बद्दलचे कागदपत्रे पुरावा म्हणून ही दिले आहेत तरी त्याच्या विरुद्ध कसला ही गुन्हा दाखल केला नाही.तक्रारीत महालक्ष्मी इंटरप्राजेस चे मालक शशिकुमार भुजबळ,गणेश भुजबळ,महेश भुजबळ यांनी सोनई डेअरीच्या नावाखाली आमची रुपये 19 लाख 99 हजाराची फसवणूक केली आहे असे नोंद केली आहे.अनेक महिने नलावडे कुटुंबियांनी पाठपुरावा केल्यानंतर इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री नाळे साहेबांनी 13 डिसेंबरला 2025 ला नलावडे कुटुंबियांना समजपत्र देऊन केस निकालात काढली आहे असे सांगून नलावडे कुटुंबियांची दिशाभूल केली आहे.हा सर्व प्रकार म्हणजे कायद्याला हरताळ लावण्याचा आहे का?ना FIR ना चारसीट तरी केस निकालात काढून पोलिस प्रशासन यांनी फिर्यादी यांच्यावर अन्याय केला आहे असे मत नलावडे कुटुंबियांचे आहे व याबद्दल ते कुटुंब पुढे जाऊन उपोषणाचा संविधानिक मार्ग अवलंबिणार आहे असे महाराष्ट्र माझा 24 शी बोलताना सांगितले आहे.








