23 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊसाचे पुनरागमन होईल ….? – DGST


पुणे: स्वतंत्र संशोधक म्हणून ओळख निर्माण करणारे संशोधक DGST(देशमुख ग्लोबल शिल्ड थियरी) चे संस्थापक श्री प्रशांत देशमुख यांनी मे महिन्यात जाहीर केलेल्या तारखे दरम्यानच मौसमी पावसाचे आगमन झाले होते साधारण दीड महिन्याच्या आधी 5 जुलै ही तारीख DGST ने जाहीर केली होती व पाऊस त्याच दरम्यान सुरू झाला. एक किंवा दीड महिने अगोदर मान्सून ची तारीख जाहीर करण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे.

IMD किंवा WMO या संस्था तीन किंवा पाच दिवस अगोदर हवामानाचा अंदाज वर्तीवतात व यामध्ये सुधा ते 100 टक्के सत्य होईल याची कोणतीच शाश्वती या संस्थांना नसते. पण DGST ने नासाच्या JPL च्या डेटा चा आधार घेऊन वर्तीविलेले अंदाज आता पर्यंत तरी खरे ठरले आहेत ही खूप मोठी पोहच पावती DGST ला मिळाली आहे.

याच पार्श्वभूमीवर DGST ने आज पावसाचे पुनरागमन महाराष्ट्रात कधी होईल याची तारीख जाहीर केली आहे. DGST चे म्हणणे आहे की मान्सून देशात सक्रीय आहे पण काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे याची कारणे स्थानिक ठिकाणी वेगवेगळी आहेत. अती औद्योगिकरण,वाऱ्याची दिशा, भू भागाचे उत्खलन,झाडांची कत्तल, अती विकासाच्या नावाखाली कापलेली झाडे अशा विविध कारणांनी पावसाने दडी मारलेलीची चित्र आहे. तरी महाराष्ट्रात 23 जुलै नंतर पावसाचे दमदार पुनरागमन होईल असे थेट संकेत DGST ने दिले आहेत.यावर्षी पाऊस सामान्य असेल असे पूर्वीच त्यांनी जाहीर केले आहे .DGST चे अंदाज जर सत्य ठरत गेले तर भविष्यात IMD संस्था DGST च्या थिअरीचा विचार केलेलं का ?


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!