उत्तमनगर- शिवणे:आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस.त्यामुळे कोण अर्ज माघारी घेतो या कडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले होते.दुपार पर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या व कोण कोणाच्या विरोधात लढणार हे ही जनतेला समजले.मिळालेल्या माहिती नुसार प्रभाग ३३ मध्ये एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत.खरी लढत ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट)अशीच दिसते.दोन्ही कडील उमेदवारी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर अगदी प्रचाराचा धडाका लावला होता.
प्रभागातील जनतेशी थेट संवाद ठेवण्याचा प्रयत्न सर्व उमेदवार करीत आहेत. संभाव्य रणनीती आखली जात आहे.आपण कसे निवडून येऊ या साठी प्रयत्न चालू आहेत.शिवसेना(उद्धव ठाकरे गट)यांनी ही कडवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे दुरंगी असणारी लढत तिरंगी होणार असे जनतेला तरी वाटू लागली आहे
Views: 82








