टेलिग्राम ॲप वरून टास्कच्या खेळात पुणे मधील मध्यमवर्गीय युवक अमोल जगताप याची तब्बल 1.80लाख रुपयेची फसवणूक.


उत्तमनगर(पुणे) – मिळालेल्या माहिती नुसार श्री अमोल जगताप( रा.पोकळे नगर ,उत्तमनगर पुणे) हे खाजगी कंपनी नोकरी करतात,  कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्याच्या नादात टेलिग्राम वरील B- naykka task मध्ये पैसे गुंतवून पैसे मिळविण्याच्या नादाला लागले.सुरवातील पंचवीस पन्नास रुपये गुंतवून पैसे मिळविण्याचा नाद लागला.त्या नंतर दिनांक 23.02.2026 रोजी सुमारे 1.30pm च्या दरम्यान सुरवातील एका टास्क मध्ये तीन हजार रुपये टाकले.त्याचे रिटर्न तीन हजार नऊशे दिले.पैसे मिळतात म्हणून पुढील टास्क मध्ये जगताप रक्कम गुंतवत गेले. रुपये 16800, गुंतविले त्याचे  28000 हजार रुपये झाले.ती रक्कम काढण्यासाठी पुढील टास्क पूर्ण करावा लागेल असे सांगितले त्यात त्यांनी 49999 रुपयाची मागणी केली तेही जमा केले त्याच्या नंतर ॲप मध्ये रक्कम वाढलेली दिसली.ती रक्कम काढण्यासाठी रुपये 109999 चा टास्क देण्यात आला त्यावेळी रुपये 112000 जमा झालेले दिसले हा टास्क पूर्ण करण्यासाठी तीन ट्राजेक्षण मध्ये पेमेंट केले अनुक्रमे रुपये 9999,50000,50000 जमा केले त्यावेळी 289417 रक्कम जमा झालेली दिसली ,हिं काढण्यासाठी पुढचा टास्क दिला तो साधारण दीडलाख रुपयाचा होता.सदर रक्कम देण्याची क्षमता आता श्री अमोल जगताप यांची संपली होती.त्यांनी त्यांना विनंती केली की जेवढी शक्य असेल तेवढी रक्कम परत देण्याची , परंतु त्यांनी पैसे भरण्याचा तगादा लावला पण ते आता जगताप यांना शक्य नव्हते.त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की आपली आर्थिक फसवणूक झाली आहे.

तक्रार देताना श्री अमोल जगताप व सायबर शाखेचे अधिकारी सौ लंगर मॅडम

त्या  संदर्भात सायबर ऑनलाईन नंबर 1930 वरती कंप्लेंट केली.त्याच बरोबर उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये या संदर्भात सायबर गुन्हे शाखा येत मॅडम सौ.लंगर यांच्या कडे ही त्यांनी तक्रार नोंद केली आहे पुढील तपास सायबर शाखेचे पोलिस अधिकारी करीत आहेत.

 


2
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!